राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेडमध्ये उत्साहात संपन्न दैनिक 'वीर शिरोमणी' व साप्ताहिक 'नंदगिरीचा कानोसा'चा वर्धापन दिनही साजरा
नांदेड, १८ मे – राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन व दैनिक 'वीर शिरोमणी' व साप्ताहिक 'नंदगिरीचा कानोसा' या वृत्तपत्रांचा वर्धापन दिन शनिवार, १८ मे रोजी नांदेड येथील हॉटेल ताज पाटील येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत अधिवेशनाची गरिमा वाढवली. सर्वप्रथम आमदार भीमरावजी केराम ,लंगर साहीब गुरुद्वाराचे गुलाबसिंग महाराज ,संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला करण्यात आली सर्व मान्यवरांचा येतोचित मानसन्मान सत्कार यावेळी करण्यात आला अधिवेशनाचे उद्घाटन किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी होते या अधिवेशनात पत्रकारांच्या समस्या, माध्यम क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेचे प्रश्न या...