Skip to main content

साने गुरुजी रुग्णालयाच्या वर्धापनदिन सोहळ्या निमित्त उद्या युवा कार्यशाळा, व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन


किनवट,दि.२४ : साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमीत्त उद्या(दि.२५) युवा कार्यशाळा, व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारत जोडो युवा अकादमी चे अध्यक्ष व साने गुरुजी रुग्णालयचे संचालक डॉ.अशोक बेलखोडे यांनी दिली.

    सोमवारी (दि.२५) सकाळी १०:३० वाजता युवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अंधश्रध्दा निर्मुलनाचा कायदा - निर्मीती, उपयोगीता, अंमलबजावणी व समज - गैरसमज याबाबत अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, लातूर हे मार्गदर्शन करणार आहेत. सेवानिवृत्त प्राचार्या सविता शेटे, बीड ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आहेत. सायंकाळी ५:३० वाजता पद्मविभूषण बाबा आमटे स्मृती व्याख्यानमाले निमीत्त  डॉ. प्रल्हाद लुलेकर, छ. संभाजीनगर यांचे व्याख्यान होणार आहे. डॉ. वासूदेव मुलाटे, छ. संभाजीनगर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. रात्री ८ वाजता निमंत्रित व स्थानिकांचे कवी संम्मेलन होणार असून सुप्रसिध्द कवी - गितकार प्रकाश घोडके, पुणे प्रा. डॉ. विनायक पवार, पनवेल प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले, नांदेड यांच्यासह स्थानिक कविंचा सहभाग राहणार आहे. प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, नांदेड हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे हे आहेत.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...