Skip to main content

Posts

Showing posts from December, 2023

किनवट शहर परिसरात उच्छाद माजवणाऱ्या मोकाट गाढवांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी नगर पालिकेस निवेदन....

किनवट प्रतिनिधी:- किनवट शहरातील छ. शिवाजी चौक हे गजबजलेल परिसर आहे या परिसरात मुख्य बाजारपेठ आहे शालेय विद्यार्थि, वयोवृद्ध, बालके ये- जा करतात काल अशीच एक घटना घडली एक युवक आपल्या भाची व पुतणी सोबत उबदार कपडे स्वेटर कानटोपी वैगरे घेण्यासाठी गेले  असता अचानक दोन- तीन गाढव सुसाट वेगाने धावत आले असता चिमुकली उडवणार इतक्यात एका युवकाने चटकन उचलुन धरले अन्यथा त्या लहान बालकास गंभीर इजा झाली असती तरी या गंभीर घटनेची दखल घेऊन योग्य ती ठोस पावले उचलावी मोकाट गाढव, जनावरे यांना खुले आम मोकाट सोडणार्‍यावर देखील योग्य ती कार्यवाही केली जावी या करीता नगर पालिकेस या आशयाचे निवेदन  सादर करण्यात आले आहे . या निवेदनवर सामजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजेश पाटील व टिपु सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  योग्य ती कार्यवाही न झाल्यास टिपु सुलतान ब्रिगेड तर्फे आंदोलन करण्यात येईल असे माहिती टिपु सुलतान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील दिव्यांगांना मिळणार फिरते दुकान सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष अॅड एम यु सर्पे यांची माहिती

  किनवट,दि.२४ : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल अर्थात फिरते वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी चार जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत,असे आवाहन नांदेड जिल्हा सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंट चे अध्यक्ष अॅड.एम.यु.सर्पे यांनी केले आहे.     या योजनेला १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्यादित यांच्या स्तरावरून सुरू आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नावनोंदणी व अर्ज करण्यासाठी तीन डिसेंबरला पोर्टल प्रक्षेपित करण्यात आले आहे. दिव्यांगांनी ऑनलाइन अर्ज चार जानेवारी २०२४ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत करावेत.

साने गुरुजी रुग्णालयाच्या वर्धापनदिन सोहळ्या निमित्त उद्या युवा कार्यशाळा, व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन

किनवट,दि.२४ : साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमीत्त उद्या(दि.२५) युवा कार्यशाळा, व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारत जोडो युवा अकादमी चे अध्यक्ष व साने गुरुजी रुग्णालयचे संचालक डॉ.अशोक बेलखोडे यांनी दिली.     सोमवारी (दि.२५) सकाळी १०:३० वाजता युवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अंधश्रध्दा निर्मुलनाचा कायदा - निर्मीती, उपयोगीता, अंमलबजावणी व समज - गैरसमज याबाबत अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, लातूर हे मार्गदर्शन करणार आहेत. सेवानिवृत्त प्राचार्या सविता शेटे, बीड ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आहेत. सायंकाळी ५:३० वाजता पद्मविभूषण बाबा आमटे स्मृती व्याख्यानमाले निमीत्त  डॉ. प्रल्हाद लुलेकर, छ. संभाजीनगर यांचे व्याख्यान होणार आहे. डॉ. वासूदेव मुलाटे, छ. संभाजीनगर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. रात्री ८ वाजता निमंत्रित व स्थानिकांचे कवी संम्मेलन होणार असून सुप्रसिध्द कवी - गितकार प्रकाश घोडके, पुणे प्रा. डॉ. विनायक पवार, पनवेल प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले, नांदेड यांच्यासह स्थानिक कविंचा सहभाग राहणार आहे

वर्धापण दिना निमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धा

  किनवट:- साने गुरुजी रुग्णालयाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या वेळी एम के टी स्कूल , एस व्ही एम स्कुल, कन्याका परमेश्वरी शाळा अशा   विविध शाळेचे शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी भरभरून सहभाग घेतला होता त्याचे हे बोलके छायाचित्र या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले आहे

इंडीया आघाडीची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध

  किनवट शहर प्रतिनिधी:- किनवट येथील जिजामाता चौकात इंडियाआघाडी व मित्रपक्षांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केले निषेध आंदोलन लोकसभेतील खासदारांच्या निलंबन प्रकरणी इंडिया आघाडी व मित्र पक्षाच्या वतीने देशभरात रोष व्यक्त करण्यात येत असून 22 डिसेंबर रोजी किनवट येथील जिजामाता चौकात इंडियाआघाडी व मित्रपक्षांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले असून खासदारांचे निलंबन मागे घ्यावे, कापसाची भाववाढ करावी जुलै महिन्यातील अतिवृष्टीचे मंजूर अनुदान त्वरित वितरित करावे तसेच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. संसदेवर झालेल्या भ्याड हल्यानंतर या घटनेचा जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या 140 पेक्षा अधिक खासदारांना गोंधळ घातल्याच्या कारणावरून निलंबित केले. या निलंबनाविरोधात इंडिया आघाडी व मित्रपक्षा कडून जोरदार विरोध केला जात असून दि 22 डिसेंबर रोजी किनवट येथील जिजामाता चौकात दु 12 वा महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, कम्युनिस्ट यांच्यासह मित्र पक्षांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आ