Skip to main content

इंडीया आघाडीची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध




 किनवट शहर प्रतिनिधी:-

किनवट येथील जिजामाता चौकात इंडियाआघाडी व मित्रपक्षांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केले निषेध आंदोलन

लोकसभेतील खासदारांच्या निलंबन प्रकरणी इंडिया आघाडी व मित्र पक्षाच्या वतीने देशभरात रोष व्यक्त करण्यात येत असून 22 डिसेंबर रोजी किनवट येथील जिजामाता चौकात इंडियाआघाडी व मित्रपक्षांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले असून खासदारांचे निलंबन मागे घ्यावे, कापसाची भाववाढ करावी जुलै महिन्यातील अतिवृष्टीचे मंजूर अनुदान त्वरित वितरित करावे तसेच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.


संसदेवर झालेल्या भ्याड हल्यानंतर या घटनेचा जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या 140 पेक्षा अधिक खासदारांना गोंधळ घातल्याच्या कारणावरून निलंबित केले. या निलंबनाविरोधात इंडिया आघाडी व मित्रपक्षा कडून जोरदार विरोध केला जात असून दि 22 डिसेंबर रोजी किनवट येथील जिजामाता चौकात दु 12 वा महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, कम्युनिस्ट यांच्यासह मित्र पक्षांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले आहे. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध अशा आशयाचे फलक झळकावत खासदारांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे कापसाचे भाववाढ करावी अतिवृष्टीचे अनुदान त्वरित वितरित करावे मंजूर पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी अशा विविध मागण्या यावेळी केल्या आहेत. कॉ अर्जुन आडे, उपसभापती राहुल नाईक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के मूर्ती जयपाल जाधव, अतुल दर्शनवाड यांनी मोदी सरकारच्या हिटलरीवृत्तीचा तीव्र शब्दात समाचार घेतला. भाजप सरकारला सत्तेचा अहंकार चढला असून हे सरकार जाती-धर्माच्या नावाखाली विकासाला मूठमाती देऊन

शोषित,वंचित शेतकरी शेतमजूर व कामगारांची पिळवणूक करत असल्याचा आरोप करत या सरकारला खुर्चीवरून खाली खेचले पाहिजे असे आवाहन केले.


या निषेध आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, कॉ अर्जुन आडे, सभापती गजानन मुंडे, बाजार समितीचे संचालक अनिल पाटील कराळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष के मूर्ती उपसभापती राहुल नाईक राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष बालाजी बामणे आदिवासी नेते जयवंत वानोळे माजी उपसरपंच प्रवीण म्याकलवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अतुल दर्शनवाड, अजित साबळे, श्रीराम कांदे, बंटी जोमदे, अजय कोवे, शेख सलीम शेख मदार, शेख सरुभाई, राजू सुरवसे मा आमदार प्रदीप नाईक यांचे स्वीय सहायक रोहिदास जाधव अंबाडीचे सरपंच गिरिधारी जाधव, जयपाल जाधव, कॉ स्टॅलीन आडे, कॉ जनार्दन काळे, कॉ मोहन जाधव, माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन, बाळू पवार, गंगाधर बट्टलवाड, गोविंद धुर्वे, सुदर्शन गवळे ज्ञानेश्वर सिडाम, प्रमोद मुनेश्वर, दत्ता पवणे, अमोल जाधव, सिद्धांत नरवाडे, अर्शद खान, शेख अक्रम मनोज श्रीरामे, जीवन राठोड, संतोष मिरासे, शेख पाशा, रवी दांडेगावकर, रामेश्वर चव्हाण, रामदास राठोड, अश्विन पवार, अमेर भाई, वसंत राठोड, नवीन गालेवार, कोमल भवरे, साई जाधव, शुभम पांचाळ, मोनू गायकवाड, संग्राम शेवाळे यांच्यासह मित्रपक्षातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.