Skip to main content

-मैत्री...मानवी संवेदनांचं नंदनवन मिता नानवटकर यांचा मैत्रीच महत्व सांगणारा लेख नक्की वाचुया




शीर्षक-मैत्री...मानवी संवेदनांचं नंदनवन मैत्री दोन जीवाचं एक अनोखंच नातं...भावभावनांनी,जाणिवांनी,विचारांनी गजबजलेलं सुंदर असं गाव.वय,लिंग,देश,भाषा या सर्व मर्यादेपलीकडे संवेदनांनी सजलेलं,सामंजस्याने बहरलेलं,शब्दांच्या एका चौकटीत पूर्णपणे व्यक्त न होणारं हे नातं..... एका अद्भुत अनुभूतीने जेंव्हा हेच नातं तनामनात अलवार स्पर्शून जातं तेव्हा अंतर्मनी उसळणारी ती जाणीव खरंच विलोभनीय असते. दोन मनांचे प्रतिबिंब डोळ्यांत स्पष्ट पाहता येईल... हृदयाच्या सुप्त जाणीवा अबोल ओठांतून शब्दांविनाही ऐकू येईल.. अंतर्बाह्य उमळणारा स्पर्श सहज अनुभवता येईल... इतकी जवळीकता आणि समर्पकता या मर्मबंधनात सहज जाणवते.. थरथरणाऱ्या बोटांतून... आंतरिक वेदना ओळखल्या की खोट्या हास्यामागे दडलेला.. पापणकाठी गोठलेला आसवांचा बर्फ क्षणातच वितळून गालावर ओघळतो आणि हृदयनभी उठलेलं वादळ शांत होवून भावनांना पायवाट लाभते...आनंद 'माझा' उरत नाही 'आपला' होतो.एकमेकांच्या सहवासात अंतरातला 'मी' सहजगत्या व्यक्त होतो.का.. कसे...ही औपचारीकता गौण ठरते.जे मनात तेच ओठांवर निर्भयपणे येवून अभिव्यक्तीचा दिलखुलास आनंद लुटला जातो.कधीकधी होणारी विचारांची जटील गुंतागुंतही आपुलकीच्या संवादातून अलगदपणे सुटते आणि मोठमोठी वादळंही पेलण्याचा एक खंबीर विश्वास मिळत जातो.छोट्या-छोट्या गोष्टींतही एकमेकांच्या सहवासात साजरा होणारा हर्षोत्सव हा चिरकाल स्मृती कोंदणात टिकणारा असतो. स्त्री-पुरुष म्हणून असणारी संकुचित दृष्टी येथे नकळतच नाहीशी होते.उरते ती फक्त साहजिकच वाटणारी काळजी आणि समवैचारिकतेची अनामिक ओढ.... अस्तित्वाची कळी खुलवणारी धुंद निशा तर कधी नैराश्याची मरगळ समुळ झटकणारी प्रफुल्लित उषा..हक्काने रागवणं, हवं ते हवं तेंव्हा मागणं,चुकलंच काही तर हळुवार सावरणं,प्रशंसेची तितकीच भरभरून बरसात करणं,नाजुक वेळी आश्वासक शब्दांची चादर पांघरणं..... अजून बरंच काही असतं जे सांगायला शब्दच नाही सापडणार. कुठली कमीटमेंट नाही,वचनांची वर्दळ नाही, भविष्याचे वेध नाही,स्वप्नांची आरास नाही,मागण्यांची किटकिट नाही अन् अपेक्षांची सावलीही नाही.असेल तो फक्त परस्परांवरचा विश्वास.. या नात्याचा पाया... भावनांची इमारत कण्खरपणे सांभाळणारा.... आयुष्याच्या एका वळणावर कुणी सोबत असेल नसेलही कदाचित...पण तो सोबतीचा आभासही खूप काही देवून जाईल ....'मी आहे ना' हे शब्दच पुरेसे असतील पुन्हा नव्याने उठून जीवनाची लढाई लढायला...... खचलेल्या मनाला सावरायला.....कानी पडत राहतील....धीर देणारे प्रत्येक शब्द... स्वतःला झोकून उंच झेपावण्यास प्रेरीत करणारा हात....... परस्परांच्या मनात आठवांचं चांदणं सदैव पडत राहील....असंच....आणि भिजत राहील जग या नात्यातील अलौकिक धुंद सरीत.......
 


मीता अशोक नानवटकर मु.आजणी पो.खानगाव ता.सावनेर जि.नागपूर पि.को.441107. मो.नं 9823219083.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.