Skip to main content

Posts

Showing posts from April, 2026

तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या शासन उपक्रमाअंतर्गत शिधापत्रिका धारकांना योजनेचा लाभ...

प्रतिनिधि किनवट: मा. तहसीलदार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, माहे एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत (एकूण २१ महिने) पुरवठा विभागामार्फत महत्त्वपूर्ण कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कालावधीत श्री. निलेश राठोड (निरीक्षण अधिकारी), श्री. सतीश सरनायक (पुरवठा निरीक्षक), श्री. मन्मथ मुगटकर, श्री. महेश चांदेकर श्री. श्रीकांत ठाकरे श्री. विनोद सोनकांबळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून १५८ गावांतील एकूण शेतकरी लाभार्थी शिधापत्रिका ३१४७ त्यावरील लाभार्थी संख्या ११५९७ असलेल्या शिधापत्रिका कार्डधारकांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली आहे.  या उपक्रमांतर्गत एकूण ₹४,०५,२३,०७७/- (रुपये चार कोटी पाच लाख तेवीस हजार सत्त्याहत्तर फक्त) इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या कार्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व पात्र लाभार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून शासनाच्या योजनांचा लाभ पारदर्शक व प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यात आला आहे.

महिंद्रा प्राइड क्लासरूम तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न; प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

किनवट : महिंद्रा प्राइड क्लासरूम व नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेसाठी नांदी फाउंडेशनचे मुख्य प्रशिक्षक अक्षय मेश्राम यांनी सलग तीन दिवस विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले. कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेंद्र गट्टानी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. आदिवासी भागातील दुर्गम विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मुलाखत कौशल्य व व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ते जागतिक स्पर्धेत सक्षमपणे उभे राहावेत, या दृष्टीने विद्यापीठ प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रातील दोन विद्यार्थिनी—ऐश्वर्या पंढरीनाथ सेलूकर व प्रणाली मारोती मेश्राम—यांची केस स्टडी महिंद्रा प्राइडस...