किनवट पोलीस स्टेशनला मिळालेल्या फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हे उघड होण्यास गती मिळणार : पोलीस निरीक्षक चोपडे
किनवट : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि न्यायदानात पारदर्शकता आणण्यासाठी किनवट पोलिस दलाला अत्याधुनिक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन मिळाली आहे. नांदेड जिल्ह्यासाठी एकूण दोन व्हॅन उपलब्ध झाल्या असून त्यापैकी एक किनवट विभागाला देण्यात आली आहे. या व्हॅनचे कार्यक्षेत्र किनवटपासून भोकरपर्यंत असणार असून, या व्हॅनमुळे गुन्ह्यांचा तपास अधिक जलद आणि परिणामकारक होईल, अशी माहिती किनवट पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिली. ही व्हॅन अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असून, डीएनए, रक्त, रासायनिक विश्लेषण, तसेच डिजिटल पुराव्यांचे संकलन यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा त्यात बसविण्यात आल्या आहेत. व्हॅनमध्ये सहा प्रशिक्षित फॉरेन्सिक कर्मचारी कार्यरत राहणार असून ते घटनास्थळी तात्काळ पोहोचून तपासाची प्राथमिक प्रक्रिया सुरू करतील, या उपक्रमामुळे गुन्हा घडताच घटनास्थळावरील पुरावे तत्काळ गोळा केले जातील आणि सुरक्षित ठेवले जातील. यामुळे पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता कमी होणार असून, तपास जलद गतीने पूर्ण होईल. प्राथमिक निष्कर्ष मिळवणे सुलभ होईल आणि न्यायाल...