Skip to main content

Posts

Showing posts from January, 2024

मुलींना कुठलही समस्या उद्भवत असल्यास तत्काळ मदतीसाठी ११२ टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.- पो. नि. दीपक बोरसे

  तालुका प्रतिनिधी किनवट महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी तालुका किनवट येथे दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त " कायदा व सुव्यवस्था " या विषयासंदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. किनवट पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मोबाईल तंबाखू गुटखा या व्यसनापासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. विद्यार्थ्यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे आपल्या आई-वडिलांची मान शरमेने खाली झुकेल असे कोणतेही कृत्य करू नये. आपल्या प्रत्येक कृत्याचा आपल्या आई-वडिलांना गुरुजनांना अभिमान वाटला पाहिजे असे आचरण करावे. शाळा महाविद्यालयातील मुलींना शाळा - महाविद्यालयातील किंवा बाहेरच्या मुलांनी त्रास झाल्यास ११२ क्रमांकावर संपर्क करावा तत्काळ मदत मिळेल असे विचार त्यांनी त्या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या शुभांगीताई ठमके होत्या.  कार्यक्रमास बोदमवाड साहेबांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात  राष्ट्रपिता