Skip to main content

Posts

Showing posts from September, 2023

साहित्यिकांनी भूमिका घेऊन लिहिले पाहिजे - अशोक कुबडे -राज्यस्तरीय साहित्य संमेलनाध्यक्षांचे प्रतिपादन - साहित्य लेखनाबरोबर प्रसारणही आवश्यक

   वर्धा/ पुलगाव-   साहित्यिक लेखकांनी आपली भूमिका निश्चित करून साहित्य लेखन केले पाहिजे. उत्स्फुर्तपणे आलेल्या विषयावरती लेखन केले तरच दर्जेदार साहित्य निर्मिती होते.नवोदीत साहित्यिकांनी ज्येष्ठ साहित्यिकांचे साहित्य वाचलं पाहिजे तरच आपल्या साहित्याला योग्य दिशा मिळेल अन्यथा आपण भरकटत राहू.            जास्तीत जास्त वाचन करून कमीत कमी लेखन केले पाहिजे अन्यथा या साहित्य लेखनाच्या प्रचंड मोठ्या प्रवाहात आपण सहज वाहून जाऊ.. प्रत्येकाने लेखन आणि साहित्य वाचकांपर्यंत पोहोचणे हे जबाबदारीने केले पाहिजे साहित्य लिहून मोकळे होता कामा नये. साहित्यिकांनी नियोजनबद्धपणे लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्यिकांनी आपली लेखनाची साहित्य प्रसारणाची एक भूमिका घेऊन साहित्य लेखन केले पाहिजे.            असे प्रतिपादन पुलगाव वर्धा येथे पार पडलेल्या चौथ्या अव्यक्त अबोली राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे यांनी केले.                   यावेळी मंचावर साहित्य संमेलनाचे उद्घाटक दीपक नगराळे, स्वागताध्यक्ष मनोहर शहारे,साहित्यिक अशोक वाघमारे, मुख्य आयोजक जयश्री

मा. अशोक कुबडे यांनी अव्यक्त अबोली राज्यस्तरीय साहित्य संमेलन मंचावरून साधलेला संवाद

   आज अव्यक्त अबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मी आपल्याशी संवाद साधणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे, महात्मा गांधी, बाबा आमटे....यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो.  मी ज्या भूमीतून आलेलो आहे ती मराठवाड्यातील नांदेडनगरी आहे..जी की, गुरुगोविंदसिंगजी यांच्या पदस्पर्शाने पावन आणि गोदावरीच्या खळखळ पाण्याने पवित्र झालेली आहे.   आज 17 सप्टेंबर मराठवाडा-हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन. आज मराठवाडा-हैदराबाद निजामाच्या तावडीतून मुक्त झाले. मराठवाड्याला जुलमी निजामाच्या तावडीतून जाचातून मुक्त करण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपलं बलिदान दिलं त्यांना आणि ज्यांनी प्राणपणाने लढा दिला ते.. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राफ, हुतात्मा पानसरे, आदी सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो... 1947 ला भारत स्वतंत्र झाला. सर्व भारतातली संस्थाने खालसा करण्यात आली.. पण हैदराबाद येथील जुलमी निजाम आपलं साम्राज्य संपवण्यासाठी तयार नव्हता.. त्यावेळेला पोल

माझं गाव माझी ग्रामपंचायत

  किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनी तसेच मित्रहो आज आपण एक नवीन विचार तथा विचार पुष्प घेऊन वाचकाच्या समोर आलेलो आहेत ते म्हणजे तुमचा आमचा जिव्हाळ्याचा विषय आपली ग्रामपंचायत कशाप्रकारे त्याचा प्रशासकीय कारभार चालतो ग्रामपंचायत गावाचा विकास करण्यासाठी कोणकोणते अभिलेखे वापरते अथवा ग्रामपंचायतला ज्या बाबीचे अधिकार आहेत किंबहुना नागरिकाला सुद्धा अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्याबाबतचा वापर आज आपण या ठिकाणी करणार आहोत. ग्रामपंचायत नमुने 1 ते 33 (अभिलेख ) असतात  प्रशासनाच्या संरचनेतील अंतिम टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीला अनन्य साधारण महत्व आहे. तीला सुव्यवस्था प्राप्त होण्यासाठी व ग्रामपंचायतीने केलेली कामे व व्यवहार यांच्या नोंदी ठेवण्यासाठी एकूण ३३ Gram panchayat namuna नमुन्यात कामकाजाची नोंद ग्रामपंचायतीला ठेवावी लागते. त्या नूमुन्यांना ग्रामपंचायत अभिलेख नमुने 1 ते 33 'ग्रामपंचायतीचे अभिलेख' किंवा 'ग्रामपंचायतीच्या नोंदवह्या' असेही म्हटले जाते. हे नुमने म्हणजे ग्रामपंचायतीचा आत्मा असतो. काही नमुने वर्षाच्या सुरव