Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

किनवट च्या नागरीकांना पेट्रोल-डिझेल पासून मिळणार मुक्तता..!

  किनवट :(तालूका प्रतिनिधी)            भारताला इंधनामध्ये स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचे अथक प्रयत्न चालू असून त्याचाच एक भाग म्हणून CNG, PNG  गॅस व सेद्रिंय खत तयार करण्यासाठी  मोठ्या प्रमाणामध्ये भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने किनवट मध्ये CNG तयार होणारा असून  मोटरसायकल, आटो, कार ह्या वाहनासाठी CNG गॅसपंम्प सुरु होणार आहेत. त्याच बरोबर घरगुती गॅस तयार होणार आहे. सेंद्रिय खत शेतक-यांना दोन वर्ष मोफत देऊन सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर मालाला बाजारपेठ उपलब्ध करुण देण्यात येईल. यासाठी नागरीकांनी सभासद होणे आवश्यक आहे.           बायो CNG म्हणजे गवत, काडीकचरा इत्यादी पासून नैसर्गिकरीत्या गॅस तयार करण्यात येतो. ज्यावर आता शहरातील मोटरसायकल, ऑटो,  कार  चालणार आहेत. त्यामुळे वाढत्या पेट्रोल व डिझेल किंमती पासुन कायमची मुक्तता तर  किनवट तालुका इंधनामध्ये स्वयंपूर्ण होऊन देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये वाटा उचलणार आहे.           बायो - CNG पासून शेतकऱ्यांनाही वर्षाला लाखोचे उत्पन्न एका एकर मध्ये मिळनार आहे. पुर्णपणे सेंद्रिय खतांवर आधारीत  गवत शेतकर्‍यांनी शेतात लाव