रमामाता प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांची संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन
किनवट (ता.) — भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाजक्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रमामाता प्रतिष्ठानच्या वतीने भव्य संयुक्त जयंती महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 11 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अध्यक्षपदी आकाश वि. आळणे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रवी सूर्यवंशी* यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सचिवपदी प्रतिकेश दि.ओंकार यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी निखिल ओंकार यांची निवड करण्यात आली असून सहकोषाध्यक्षपदी कपिल बलखंडे यांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.