Skip to main content

Posts

Showing posts from October, 2023

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी

  किनवट/ गोकुंदा :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. दोघांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शेख हैदर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक श्री.जूनगरे सर, जेष्ठ शिक्षक श्री.भाटशंकर सर,श्री.दामोदर सर,श्री.पवार सर, पर्यवेक्षक श्री.डांगे सर,श्री.मुनेश्वर सर, श्रीमती नगारे मॅडम हे उपस्थित होते.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वाढे सर व नरेंद्र कानिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर उईक सरांनी केले.