...बाबा...
आभाळाची निळाई तू,समुद्राची शाई तू
भेगाळलेल्या भुईतल अंकूर तू,घायाळांसाठी फुंकर तू
शेतक-यांचा मेघ तू,दीनदुबळ्यांसाठीचा वज्र तू
न शमणार वादळ तू,कोटी कुळांचा उद्धारक तू
आडाणीसाठींच अक्षर तू,शिकणाऱ्यांसाठी साक्षर तू
ज्ञानाचे विद्यापीठ तू,समतेचा विचार तू
भगिनींचा अधिकार तू,कामगारांचा ठराव तू
मानवातला महामानव तू,जगाचा कायदा तू
स्वाभिमान-अभिमान तू, संविधान तू
चळवळ तू,श्वासातली दरवळ तू
बाबा तूच आमच्यासाठी सर्वासवे व्याप्त आहे
जे जे तुझ्या क्रपेने आम्हास प्राप्त आहे...
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211
Wow 🥺 beautiful 🥰 poem
ReplyDelete🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDelete